सुप्रीम इंडस्ट्रीज लि. येथे भव्य रक्तदान शिबिर यशस्वी संपन्न
२२२ रक्तदात्यांनी केले रक्तदान. सर्वात जास्त रक्तदान शिबिर आयोजन करून सर्वाधिक रक्तदानाचा सन्मान सुप्रीम इंडस्ट्रीज यांना मिळाला.
सुप्रीम इंडस्ट्रीज चेअरमन श्री बजरंग लालजी तापडिया साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सुप्रीम इंडस्ट्रीज गाडेगाव यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सुप्रीम चे व्यवस्थापक श्री सुरेश मंत्री, जीके सक्सेना, ज्ञानदेव महाडिक, विपुल पारिख, गजानन डीकोंडीवार, जी.के. रमेश, धनंजय जेहुरकर, रविकिरण कोंबडे, सुशील चौधरी, संतोष कडगड, ललित बोरोले यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्त संकलन केंद्र, सिविल हॉस्पिटल जळगाव यांच्या माध्यमातून गरीब गरजू रुग्णांपर्यंत रक्त पोहचविण्याचे कार्य होत असते. त्यामुळे सुप्रीम कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वाधिक रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आल्यामुळे सुप्रीम इंडस्ट्रीज लि. गाडेगाव यांचा शासनाच्या वतीने शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर, पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ दीपक शेजवळ, डॉ कविता मॅडम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व सुप्रीम व्यवस्थापक, सुप्रीम कर्मचारी कामगार, सर्व कंत्राटदार, सुरक्षा विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे सर्व डॉक्टर्स व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Swasth Nari Sashakt Parivar Health Camp
Under the guidance of Respected Dean Dr. Girish Thakur, a multispecialty health camp was organized at the Chincholi campus as part of the "Swasth Nari Sashakt Parivar" initiative, catering to the health needs of female workers.
A total of 130 female construction workers and children underwent comprehensive health checkups. The camp featured a multidisciplinary team of doctors from Medicine, Obstetrics & Gynecology, Surgery, Ophthalmology, Dermatology, and Pediatrics departments.
Necessary blood investigations were conducted, and medicines were distributed to the patients.
The following doctors were available for patient checkups: Dr. Yogita Bavaskar, Dr. Neha Chaudhari, Dr. Sangita Gavit, Dr. Daniel Saji, Dr. Pratiksha Auti, Dr. Amrita Shastri, Dr. Mahesh Chavan, Dr. Suvarndip Patil, Dr. Ahmed Akbani, Dr. Utkarsh Vashishtha, and Shri Chetan Patil.
A health awareness session on nutrition was also conducted by Dr. Yogita Bavaskar, the nodal officer for the Swasth Nari Sashakt Parivar campaign of GMC Jalgaon.
राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस
दिनांक ०१/१०/२०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस विकृतीशास्त्र विभागातर्फे उत्साहाने साजरी करण्यात आला.
कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मा. अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर उपस्थित होते. तसेच उपअधिष्ठाता डॉ मारोती पोटे व डॉ रमेश वासनिक, वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्मेंद्र पाटील, सर्व विभागप्रमुख व अध्यापक वर्ग, परिचारिका व अधिसेविका आदी देखील उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दीप प्रज्वलनाने व तसेच रक्त गटाचे संशोधक 'सर कार्ल लँडस्टीनर' यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यासोबतच 'राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस' निमित्त भित्तिपत्रक फलकाचे प्रमुख उपस्थितांनी अनावरण केले.
त्यानंतर विकृतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ दिपक शेजवळ यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. उपअधिष्ठाता डॉ मारोती पोटे व वैद्यकिय अधीक्षक डॉ धर्मेंद्र पाटील यांनी सर्व उपस्थितांना रक्तदाना विषयी प्रभोदन केले, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल गोरगरीब गरजू रुग्णांचे हित लक्षात घेता जास्तीत जास्त लोकानी स्वैच्छिक रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले.
कार्यक्रमात जवळपास ३० स्वैच्छिक रक्तदाता व आघाडीचे रक्तदान शिबीर आयोजक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
तसेच ह्या सर्वाना असे पहिल्यांदाच, रक्तगटाचे संशोधक 'सर कार्ल लँडस्टीनर' यांचे नावे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. जेणेकरून जास्तीत रक्तदान शिबीर आयोजक व रक्तदात्यां मध्ये रक्तदाना विषयी उत्साह वाढेल.
त्यात वर्ष २०२५ मध्ये शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव करिता सर्वोच रक्तसंकलन करून देणारे मानकरी खालील यादी प्रमाणे ठरले.
१) जगतगुरु नरेंद्राचार्य संस्थान, जळगाव - ३०१ पिशव्या
२) सुप्रीम इंडस्ट्रीज, जळगाव एम. आय. डी. सी व गडेगाव - २८८ पिशव्या
३) महाराष्ट केमिस्ट व ड्रगीस्ट एसोसिएशन, जळगाव - २५० पिशव्या
४) औष्णिक वीज निर्मिती केंद्र वसाहत, दीप नगर, भुसावळ - १९१ पिशव्या
५) संत निरंकारी मंडळ, पाचोरा - १४१ पिशव्या
६) जैन इरिगेशन, जळगाव - १४१ पिशव्या
७) अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद, जामनेर - ११३ पिशव्या
८) भाजप कार्यालय, जामनेर - ९२ पिशव्या
९) डॉ. अब्दुल गफ्फार मलिक साहब फाउंडेशन, जळगाव - ८५ पिशव्या
१०) जी. एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव - ८२ पिशव्या.
ह्या कार्यक्रमात, जवळपास १०० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून विक्रम नोंदवनारे जळगाव जिल्ह्य़ातील रक्तदाता श्री. मुकुंद गोसावी यांचा सत्कार करण्यात आला व त्यांनी देखील स्वैच्छिक रक्तदाना विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समारोप करताना, अध्यक्ष मा. अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर सर यांनी स्वैच्छिक रक्तदान हेच सर्व श्रेष्ठदान याची जाणीव आपल्या मार्गदर्शनातून सर्व उपस्थितांना करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ श्रद्धा गायगोळ व श्री लक्ष्मीकांत त्रिपाठी यांनी केलं. आभार प्रदर्शन श्री राजेश शिरसाठ यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रक्तकेंद्र प्रमुख डॉ कविता पाटील यांनी विशेष प्रयत्न व नियोजन केले. तसेच डॉ भरत बोरोले, डॉ अनघा आमले, डॉ कुणाल देवरे, डॉ निलेश पाटील, डॉ हर्षदा पाडवी, डॉ मधुवंती लांडगे, डॉ अवनी पांडे, डॉ राहुल पाटील, डॉ विद्या शिरसाठ, श्री प्रदीप पाडवी यांनी देखील परिश्रम घेतले.